खाजगी कर्जदाराच्या आर्थिक छळाला कंटाळून आत्महत्या
शुक्रवारी (दि. 16) दुपारी दोन वाजताच्या सुमारास सोमाटणे फाटा मावळ येथे एका व्यक्तीने आर्थिक छळाला कंटाळून गळफास लावून घेतला वआत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव शेखर अशोक खंबायत (वय 37, रा. सोमाटणे फाटा, मावळ) असे आहे. कुलदीप लोहोर (वय 39, रा. धामणे, ता. मावळ) याच्या विरोधात मयत व्यक्तीच्या पत्नीने तळेगाव (Talegaon) दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांपूर्वी आरोपीने, फिर्यादी यांचे पती यांना शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी 15 लाख रुपये दिले होते. त्या गुंतवलेल्या पैशांच्या बदल्यात 10 टक्के परतावा देण्यासाठी आरोपीने शेखर यांच्याकडे तगादा लावून त्यांना वारंवार शिवीगाळ, धमकी देऊन त्रास दिला. त्यामुळे कुलदीप यांच्या छळाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.