महाविकास आघाडी सरकार पाडण्यात अजित पवार यांची मोठी मदत,मंत्री गिरीश महाजन यांचा दावा
महाविकास आघाडी व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्यात मोठी मदत केली असा दावा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.
शिंदे गटातील आमदारांना जास्त निधी दिला जात आहे अशी तक्रार काही आमदारांनी केली आहे असा प्रश्न विचारला असता गिरीश महाजन म्हणाले की, माझ्याकडे अशी कोणतीही तक्रार आलेली नाही. व्यवस्थित निधी वाटप चाललेला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी अशी तक्रार केली असेल. मागच्या काळामध्ये काय झाले हे आपण तपासून बघावं.अजित दादांनी सुद्धा अशी तक्रार परवा केली आहे.अजितदादा वित्तमंत्री असताना शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांना कमी निधी दिला. त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना जास्त निधी दिला. त्यामुळे या उठावाला जेवढे उद्धव ठाकरे जबाबदार आहेत तेवढेच अजित पवार देखील आहेत. त्यामुळे सरकार पडण्यामध्ये किंवा हा मोठा गट या बाजुला येण्यामध्ये अजित पवार यांची मोठी मदत झाली आहे.