September 23, 2023
PC News24
अपघात

तळवडे : रस्ता ओलांडत असताना एका टेम्पोची धडक,कामगाराचा मृत्यू.

तळवडे : रस्ता ओलांडत असताना एका टेम्पोची धडक,कामगाराचा मृत्यू

तळवडे कॅनबे चौकाकडून महिंद्रा कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बांधकाम कामगार रस्ता ओलांडत असताना एका टेम्पोने त्याला धडक दिली व टेम्पोखाली चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 17 ) सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,भीमशाप्पा बंगारम (वय 41, रा. कर्नाटक) हे तळवडे कॅनबे चौकातून महिंद्रा कंपनीकडे जाणाऱ्या मार्गावर रस्ता ओलांडत असताना त्यांना एका टेम्पोने धडक दिली. टेम्पोची दोन्ही चाके त्यांच्या पायावरून गेली. त्यात ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी त्यांचे नातेवाईक रविकांत शिवाप्पा इमारते (वय 34, रा. ढोले पाटील रोड, पुणे) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पो (MH14 EM0382) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भीमशाप्पा यांना वल्लभनगर (पिंपरी-चिंचवड) येथील महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अपघात झाल्यानंतर टेम्पो चालक टेम्पो घटनास्थळी सोडून पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटल आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Related posts

ठाणे:समृद्धी महामार्गावर गर्डर कोसळल्याची भीषण दुर्घटना..बचाव कार्य सुरू.

pcnews24

लोणावळा : गणेशोत्सवाचे पावित्र्य राखा;कायदा, नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू : सत्यसाई कार्तिक.

pcnews24

केवळ 35 पैशांत 10 लाखांपर्यंतचा विमा

pcnews24

चाकण : नाशिक पुणे महामार्गावर बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीने गमावला जीव

pcnews24

पुणे:’तू माझी झाली नाहीस तर….??एकतर्फी प्रेमातून तरुणाने महिलेचं डोकं फोडलं

pcnews24

पुणे नाशिक महामार्गावर धावत्या शिवशाही बसला आग..सर्व प्रवासी सुखरूप

pcnews24

Leave a Comment