कलाकार बेहरे पेंटर यांचे अपघातात निधन
महाराष्ट्र दर्शन करून परत येत असताना अमरावती- नागपूर महामार्गावरील कोंढाळीजवळ वाहनाला भीषण अपघात झाला आहे. यात गडचिरोली येथील प्रसिद्ध रांगोळी चित्रकार युवराज बेहरे यांचे नागपूरमधील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. या अपघातात त्यांच्या पत्नी सुद्धा गंभीर जखमी झाल्या आहेत. युवराज बेहरे हे 20 वर्षांपासून शहरात पेंटरचे काम करित असल्याने ते बेहरे पेंटर या नावाने परिचित होते.