वर्धापनदिनी शिवसेनेची स्वच्छ्ता मोहीम-लोणावळा लायन्स पॉइंट परिसर केला साफ
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन आज राज्यभर साजरा होतोय, पुण्यात मात्र हा वर्धापनदिन वेगळ्या पद्धतीने साजरा होतोय. यासाठी शिवसैनिकांनी सकाळीच लोणावळ्यातील लायन्स पॉइंटकडे त्यांचा मोर्चा वळवला. व तिथं जाऊन त्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. पर्यटकांनी केलेला कचरा या शिवसैनिकांनी एकत्र करून बाजूला केला आणि लोणावळ्याचे लायन्स पॉइंटचे रूपच बदलले.स्वच्छ परिसरात निसर्गात आधिक आनंद व मोकळा श्वास पर्यटक अनुभवतील.