February 26, 2024
PC News24
आरोग्यखेळ

पिंपरी चिंचवड भाजपा 21 जून ला ‘एकत्रित योगा कार्यक्रम’ साजरा करणार

पिंपरी चिंचवड भाजपा 21 जून ला ‘एकत्रित योगा कार्यक्रम’ साजरा करणार

आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जूनच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवडमध्ये मावळ लोकसभा मतदार संघांतर्गत ‘एकत्रित योगा कार्यक्रम’ घेण्यात येणार आहे.यामध्ये पिंपरी-चिंचवडकर नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवडमधील निगडी- प्राधिकरण येथील मदनलाल धिंग्रा मैदानावर 21 रोजी सकाळी 6 वाजता ‘एकत्रित योगा कार्यक्रम’ होणार आहे. यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, माजी राज्यसभा सदस्य अमर साबळे, आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे, माजी महापौर माई ढोरे, सचिन पटवर्धन, प्रदेश निमंत्रित सदस्य शंकर जगताप, माजी जिल्हा अध्यक्ष सदाशिव खाडे, पिंपरी-चिंचवड प्रभारी वर्षा डहाळे आदी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाचे संयोजन राजू दुर्गे, शितल शिंदे, संदीप कस्पटे, रविंद्र माने, बाळासाहेब शेलार, मच्छिंद्र परंडवाल, रामविलास खंडेलवाल, अनंता कुडे, अविनाश बवरे यांनी केले आहे. त्यासंबंधी बोलताना राजू दुर्गे म्हणाले आपल्या देशातील सर्व नागरिकांसाठी जागतिक योग दिवस हा अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. योगा हा अनेक शतकांपासून चालत आलेला पारंपरिक व्यायाम प्रकार आहे. योगामधील काही सहज प्रकार जे आपण अत्यंत सहजपणे करू शकता असे प्रकार आणि त्यापासून आपल्याला मिळणारे फायदे या कार्यक्रमातून आपल्याला समजणार आहेत. योग प्रकारांमुळे आपण आपले आयुष्य निरोगी आणि अत्यंत सहजपणे जगू शकतो.जगभरातील नागरिकांना योगाचे महत्त्व पटावे म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 जून हा जागतिक योगा दिन म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले त्याला प्रतिसाद मिळून तो जागतिक योगा दिन म्हणून जगभरात साजरा होऊ लागला.

इंद्रायणीनगर भोसरी येथे देखील योगदिनाचे नियोजन भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर लोकसभा मतदार संघांतर्गत भोसरी विधानसभा मतदार संघातील इंद्रायणीनगर येथे सेक्टर 7 मधील सी- सर्कल येथे 21 जून रोजी सकाळी 6.30 वाजता आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. पतंजली शिक्षक सुनील हुले यांच्या सहकार्याने योगाचे प्रशिक्षण होणार आहे. संयोजनामध्ये माजी नगरसेविका नम्रता लोंढे, कामगार आघाडीचे हनुमंत लांडगे, उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष निखिल काळकुटे, भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष शिवराज लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे.

सर्व नागरिकांनी येताना योगा मॅट घेऊन यावे व वेळेत उपस्थित राहावे, असे योग दिवस संयोजक गीता महेंद्रु यांनी केले आहे.

Related posts

Tharla Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेने गाठला 100 भागांचा टप्पा

Admin

श्री मोरया गोसावी समाधी मंदिर पटांगणात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

pcnews24

महाराष्ट्र प्रशासन : खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून घोषित.

pcnews24

आंतरराष्ट्रीय क्रीडा:नेमबाजी खेळात संजना आणि हरमेहरसाठी रौप्य.

pcnews24

फेरीवाल्या आईच्या मुलाने केले एव्हरेस्ट शिखर सर

pcnews24

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील वारजे येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे आयोजन

pcnews24

Leave a Comment