September 23, 2023
PC News24
गुन्हा

MPSC परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत,महाराष्ट्रातील धक्कादायक घटना

MPSC परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत,महाराष्ट्रातील धक्कादायक घटना

(एमपीएससी) राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत राज्यात तिने मेहनतीने तिसरा क्रमांक पटाकाविला,वन परिक्षेत्र अधिकारी पदाला गवसणीही घातली पण हा आनंद ठरला क्षणिक…२६ वर्षीय दर्शना दत्तात्रय पवार (रा. कोपरगाव)या तरुणीचा वेल्हे तालुक्यातील राजगड किल्यावरील सतीचा माळ परिसरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी तरुणीचा मृतदेह सदर ठिकाणाहून बाहेर काढला. मृतदेहा जवळ मोबाइल व चप्पल आढळली असून त्यावरून तक्रारदार वडिलांनी मृतदेहाची ओळख पटवली.

या प्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी तरुणीचे वडील दत्तात्रय दिनकर पवार (वय ४७) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहिती नुसार,राजगड किल्ल्यावर रविवारी सकाळी गुराख्याला एक सडलेला मृतदेह आढळला. गुंजवणे गावचे पोलिस पाटील बाळकृष्ण रसाळ यांनी पोलिस ठाण्याला माहिती दिली. त्यानुसार सहायक निरीक्षक मनोज पवार, हवालदार औंदुबर अडवाल, ज्ञानदीप धिवार, योगेश जाधव आदी घटनास्थळी गेले. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी तरुणीचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला.

Related posts

दिघी :महिलेच्या पर्समधून पीएमपी बस प्रवासात 59 हजाराची रोकड लंपास

pcnews24

वाकड:चार वर्षीय मुलगी गायब आणि अपहरणाचा कॉल

pcnews24

दिल्ली हादरली ! भयंकर पद्धतीने 21 वेळा मुलीला चाकूने भोकसले,दगडाचे ठेचले.

pcnews24

मावळ:किशोर आवारे खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार भानू खळदेला अखेर नाशिकमधून बेड्या ठोकल्या..

pcnews24

नितीन देसाई आत्महत्याप्रकरणी त्यांच्या पत्नीची रायगड पोलिसात तक्रार.

pcnews24

अंमली पदार्थ विरोधी पथकाने 31 किलो गांजा पकडला

pcnews24

Leave a Comment