विधानसभा निवडणुकीत भाजपला 125 जागासह सर्वात मोठा पक्ष : नवीन सर्व्हे
‘न्यूज एरिना इंडिया’ या संस्थेने केलेल्या नवीन सर्व्हे नुसार ‘महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका आता झाल्या, तर महाराष्ट्रामध्ये भाजपला 125 जागा मिळतील असा अंदाज या संस्थेने केला आहे. इंटरनेटवर पाहणी करून अचूक अंदाज वर्तविण्याबाबत या संस्थेची ख्याती आहे.
महाराष्ट्राबद्दल केलेल्या सर्व्हे मध्ये भाजपला आत्तापर्यंत सर्वाधिक म्हणजे 123 ते 129 जागा मिळतील असा अंदाज वर्तविला गेला आहे. शिवसेनेला 25, राष्ट्रवादी काँग्रेसला 55, काँग्रेसला 50 ते 53, शिवसेना ठाकरे गटाला 17 ते 19 आणि इतर पक्ष व अपक्षांना 12 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.त्याचप्रमाणे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना 35 टक्के जनतेचा कौल आहे, असेही या पाहणीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
आघाडीत काँग्रेसला सर्वाधिक फायदा महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढविली, तर काँग्रेसला सर्वाधिक फायदा होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून आघाडी नसेल तर काँग्रेसला 28 ते 30 जागाच मिळू शकतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पाहणीमध्ये फडणवीस हे एक नंबर त्यांच्या खालोखाल अशोक चव्हाण, अजित पवार, एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे या क्रमाने मुख्यमंत्रिपदाची पसंती आहे.