अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक संपन्न
परभणी येथे आज दि. 19 रोजी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली.राज्यातून 350 अधिकारी व पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
या बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मोहिनी पत्की, कार्याध्यक्ष निखिल लातूरकर यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले व पुढील कार्याचे नियोजन कसे असावे याविषयी सांगितले.डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी महाराष्ट्रात येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीविषयी महासंघाची भूमिका समजावून सांगितली. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पधाधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्ती केल्या त्यामध्ये 12 ते 15 पदाधिकारी पिंपरी चिंचवड शहराला मिळाले आहेत.
असे आहेत पदाधिकारी प्रदेश सरचिटणीस – दिलीप कुलकर्णी,प्रदेश उपाध्यक्ष – पुष्कराज गोवर्धन,ब्रह्म उद्योग आघाडीचे उपाध्यक्ष – राजन बुडूख,प्रदेश उद्योजक आघाडीचे सरचिटणीस – संदीप बेलसरे,प्रदेश सचिव – मुकुंद कुलकर्णी, पावन वैद्य, सुभाष शर्मा,प्रदेश उद्योजक आघाडीचे उपाध्यक्ष – प्रभाकरन,प्रदेश वकील आघाडीचे उपाध्यक्ष – सत्यनारायण,प्रदेश चिटणीस ( महीला) – ॲ अंतर देशपांडे, शर्मिला महाजन, सुषमा वैद्य
सदस्य पुरुष – दिलीप जोशी, सुहास फोफळे, संजय कुलकर्णी, संजय परळीकर, प्रशांत कुलकर्णी, माधव बारसावडे,सदस्य महिला – वृंदा गोसावी व अनुपमा कुलकर्णी,पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी व कार्याध्यक्ष महेश बारसावडे यांनी पुढील महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची सभा पिंपरी चिंचवड मध्ये घेण्यासाठी सर्वांना निमंत्रित केले. सभेचे आयोजन परभणीचे मुख्य विलास कौसरडीकर यांनी केले.