महाराष्ट्र:तिर्थपुरीत बोगस खताचा मोठा बाजार.
जालन्यातील घनसावंगीमधील तिर्थपुरी येथे कृषी विभागाच्या पथकाने छापा टाकत बोगस खत जप्त केले आहे. शेतात प्रसिद्ध कंपन्यांच्या रिकाम्या बॅगमध्ये हलक्या दर्जाचे खत टाकून विक्री होत होती. याची माहिती मिळताच पुणे गुण नियंत्रण अधिकारी, छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हा कृषी विभागाच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. या कारवाईत भेसळयुक्त खतांच्या 35 बॅग व नामांकित कंपन्यांच्या 5000 रिकाम्या बॅग जप्त केल्या आहेत.