खेळ: फेन्सिंग मध्ये भवानी देवीने रचला इतिहास
भारताच्या भवानी देवीने सोमवारी इतिहास रचला आहे. तिने आशियाई फेन्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकून विक्रम केला आहे. सेमीफायनलमध्ये उज्बेकिस्तानच्या जेनाब दयाबेकोव्हाने भवानीचा 14-15 ने पराभव केला. त्यामुळे भवानी देवीला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. पण ती या स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय तलवारपटू ठरली आहे. उपांत्यपूर्व फेरीत भवानीने जपानची वर्ल्ड चॅम्पियन मिसाकी इमुराचा पराभव केला होता.