September 23, 2023
PC News24
खेळ

एसएनबीपीत (चिखली) ‘सुभद्रा’ आंतरशालेय,क्रीडा स्पर्धेचे आयोजन-वीस शाळा सहभागी

एसएनबीपीत (चिखली) ‘सुभद्रा’ आंतरशालेय,क्रीडा स्पर्धेचे आयोजन-वीस शाळा सहभागी

एसएनबीपी संस्थेच्या वतीने ‘सुभद्रा’ आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन संस्थेच्याच चिखली येथील डॉ. दशरथ भोसले हॉकी मैदानावर मंगळवारपासून होत आहे.एसएनबीपी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. दशरथ भोसले यांच्या आईच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

या स्पर्धेत वीसहून अधिक शाळांनी सहभाग घेतला आहे. ही स्पर्धा मुले आणि मुलींच्या गटातून एकूण नऊ खेळांमध्ये सांघिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही प्रकारात होणार आहे.

यामध्ये हॉकी, फुटबॉल, हॅण्डबॉल, थ्रो-बॉल, क्रिकेट असे पाच सांघिक प्रकार आखण्यात आले आहेत. तर मुला-मुलींच्या 12, 14 आणि 17 वर्षांखालील गटात ही स्पर्धा पार पडणार आहे. त्याचवेळी 8, 10 आणि 12 वर्षांखालील गटात कराटे, योगा, किकबॉक्सिंग, स्केटिंग अशा चार वैयक्तिक प्रकारात स्पर्धा होणार आहेत.

या सर्व स्पर्धा एसएनबीपीच्या रहाटणी आणि चिखली येथील शाळांमध्ये पार पडणार आहेत. तीन आठवडे चालणाऱ्या या स्पर्धेचा समारोप 10 जुलै रोजी होईल.

उद्घाटनाच्या दिवशी मुलांकडून मुलांसाठी किडस फॉर दि किडस अशा वेगळ्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्घाटन सोहळ्यासाठी संचालक अॅडव्होकेट ऋतुजा भोसले, संचालिका देवयानी भोसले, मुख्याध्यापिका श्वेता पैठणकर, नीना भल्ला आणि जयश्री वेंकटरण, शारीरिक शिक्षण संचालक फिरोज शेख उपस्थित राहणार आहेत.

Related posts

पिंपरी चिंचवड भाजपा 21 जून ला ‘एकत्रित योगा कार्यक्रम’ साजरा करणार

pcnews24

चीनचा पुन्हा खोडसाळपणा, व्हिसा नाकारला

pcnews24

IND vs SL Asia Cup 2023 Final : भारताने 8व्यांदा आशिया कप जिंकला, श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला, सिराजची कमाल

pcnews24

पुणे जिल्ह्यात मोशी येथे होणार तिसरे आंतरराष्ट्रीय स्टेडियम

pcnews24

मारुती सुझुकीची बेस्ट सेलिंग कार ब्रेझा.

pcnews24

कुस्तीपटू अनुराग ठाकूरांच्या निवासस्थानी

pcnews24

Leave a Comment