मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस भव्य रक्तदान शिबिर करून साजरा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवशी रविवारी (दि १८) निगडी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे रक्तदान शिबीर सकाळी ९ ते दुपारी २ निगडीच्या काचघर चौकातील गांधी नर्सिंग होम येथे झाले.यावेळी प्रत्येक रक्तदात्यास एक छत्री सप्रेम भेट देण्यात आली. रक्तदान शिबिराचे 4थे वर्ष असून निगडी प्राधिकरण मधील सर्व नागरिकांचे व गांधी नर्सिंग होमचे डॉ. नितीन गांधी यांचे विषेश सहकार्य लाभले.
रक्तदान शिबिरास मनसे शहरअध्यक्ष सचिन चिखले, डॉ. नितीन गांधी, डॉ गिरिराज गांधी, उपाध्यक्ष विशाल मानकरी, वाहतूक सेना अध्यक्ष सुशांत साळवी, वाहतूक उपाध्यक्ष नितीन सुर्यवंशी, शिवसेना महिला शहर अध्यक्ष सरीता साने, शिवसेना महिला पुणे जिल्हा अध्यक्ष शैलाताई पाचपुते, शिवसेना उपाध्यक्षा संगीता कदम, मनविसे उपाध्यक्ष प्रतिक शिंदे, उपाध्यक्षा अनिता पांचाळ, संघटक जयसिंग भाट, के.के.कांबळे, उपविभाग अध्यक्ष परमेश्वर चिल्लरगे,रोहित भोकरे, नितीन चव्हाण,नारायण पठारे, काशीनाथ खणुरकर, बालाजी पांचाळ, विठ्ठल कर्डिले, कमलेश जैन, सीमा शेलार, प्राजक्ता पाटोळे, कल्पना देशमुख, श्रुतिका देशमुख आदी उपस्थित होते.
रक्तदान शिबिराचे नियोजन, मनविसे शहर उपाध्यक्ष ओंकार पाटोळे, उपविभाग अध्यक्ष भागवत नागपूरे, प्रभाग अध्यक्ष प्रसाद मराठे, निरंजण ठोकळे, रवि ठाकुर, धनंजय देशमुख, गणेश काळभोर, गणेश उज्जैनकर यांनी केले.