September 23, 2023
PC News24
गुन्हा

जागेवर अतिक्रमण केल्याने माजी नगरसेवकाच्या मुलासह चौघांवर गुन्हा दाखल

जागेवर अतिक्रमण केल्याने माजी नगरसेवकाच्या मुलासह चौघांवर गुन्हा दाखल

जेसीबीच्या सहाय्याने जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माजी नगरसेवकाच्या मुलासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 17 जून रोजी रावेत येथे घडला.

कुणाल मोरेश्वर भोंडवे, महेंद्र जगन्नाथ गरड, अनिकेत मनोज चव्हाण (वय 29, रा. नवी सांगवी), विशाल माणिक गायकवाड (वय 27, रा. डांगे चौक, थेरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कांतीलाल मोतीलाल कर्नावट (वय 67, रा. चिंचवड) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या जागेत जेसीबीच्या सहाय्याने आरोपींनी अतिक्रमण केले. फिर्यादी यांनी याबाबत विचारणा केली असता ही जागा कुणाल मोरेश्वर भोंडवे आणि महेंद्र जगन्नाथ गरड यांची असल्याचे सांगत अतिक्रमण सुरूच ठेवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

Related posts

आणि जावयाने पाडले सासूचे 2 दात,काय घडलाय नक्की प्रकार?

pcnews24

संगनमत करून अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिले.. ‘बालविवाह प्रतिबंधक’ कायद्या अंतर्गत 15 ते 16 जणांविरोधात गुन्हा दाखल

pcnews24

पुण्यात आणखी दोन दहशतवाद्यांनाअटक; एक भूलतज्ज्ञ डॉक्टर आयसीसशी संबंधित.

pcnews24

बहुचर्चित कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपी पप्पू शिंदे याची येरवडा जेलमध्ये आत्महत्या

pcnews24

खाजगी कर्जदाराच्या आर्थिक छळाला कंटाळून आत्महत्या

pcnews24

एकतर्फी प्रेमाच्या त्रासाने १५ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या.

pcnews24

Leave a Comment