आणि बससेवा झाली सुरु…
गेल्या वर्षभरात सतत पाठपुरावा करूनही महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी बस सेवा मिळाली नव्हती. त्यामुळे मागच्या शैक्षणिक वर्षात अनेक लहान मुलं शाळेत जाऊ शकली नव्हती. परंतु यावर्षी तरी तसे होऊ नये म्हणुन वर्षभर पाठपुरावा केला गेला. अखेर त्यास यश मिळाले.
महानगरपालिकेकडून वाड्या वस्तीतील शाळाबाह्य मुलांना शाळेत जाण्यासाठी बस सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी सहगामी फाउंडेशनतर्फे सातत्याने प्रयत्न सुरू होते.
दोन्ही सत्रातील विद्यार्थ्यासाठी आज सकाळपासून महानगर पालिकेकडून मोफत बससेवा सुरु झाली.
शाळेत जाण्यास बस मिळाल्याने मुले अतिशय आनंदी होती.
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या सर्व शाळेत सुरु केलेल्या या बस सुविधेमुळे आता अनेक वाड्या वस्तीतील शाळाबाह्य मुलं शाळेत जाऊन शिकू शकतील आणि त्यामुळे बाल गुन्हेगारीला वेळीच आळा बसेल.
बस सेवा मिळावी म्हणून केलेल्या पाठपुराव्यास सर्व प्रिंट मीडिया व अनेकांचे सहकार्य लाभले.उज्वल भारताचे भविष्य घडविण्यात सर्वांनी अमूल्य योगदान दिले त्याबद्दल सहगामी फाऊंडेशनच्या प्राजक्ता रुद्रवार यांनी सोशल माध्यमातून आभार मानले आहे