सिंहगडावर गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; दोन जण जखमी.
रविवारी (18 जून) सिंहगडावर पर्यटनास आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी दोनदा हल्ला केल्याची घटना घडली.पहिला हल्ला सकाळी झाला तर दुसरा हल्ला दुपारच्या सुमारास झाला आहे. किमान 50 लोकांवर हल्ला झाला असून त्यात दोन जण जखमी झाले आहेत. दोघांनाही खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही वन विभागाने पर्यटकांना खबरदारीचा इशारा दिला आहे.
सिंहगड किल्ल्यातील काही क्षेत्र हे बाधित क्षेत्र म्हणून निषिद्ध सांगण्यात आले आहेत. त्यासाठी दोन वन कर्मचाऱ्यांची निवड केली आहे. तसेच अशा घटनांसाठी खबरदारी म्हणून किल्ल्याच्या पायथ्याशी 108 क्रमांकाची रुग्णवाहिका तैनात करण्यात आली आहे.