PCMC आयुक्त शेखर सिंह यांचा शुक्रवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद
‘संवाद आयुक्तांशी’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत आयुक्त शेखर सिंह हे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधतात. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कामकाज अधिक लोकाभिमुख व्हावे, यासाठी वेळोवेळी शहरातील विविध समाजघटकांशी संवाद साधणे हा उद्देश आहे.या ऑनलाईन कार्यक्रमामुळे नागरिकांचे प्रश्न आयुक्तां पर्यंत पोहोचतात तसेच त्या प्रश्नांना प्रतिसाद दिला जातो.या महिन्यामध्ये 23 जून शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता ‘संवाद आयुक्तांशी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महिन्यात ‘कौशल्य विकास आणि शिक्षण’ या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक आणि इतर सर्व नागरिकांकरिता हा विषय महत्त्वाचा आहे. ‘कौशल्य विकास आणि शिक्षण’ या विषयासंदर्भात आपले प्रश्न विचारण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://bit.ly/DialoguewithCommissionerqreg किंवा
PCMC सारथी App वरून देखील नागरिक त्यांच्याशी संपर्क साधू शकतात.