मोहननगर(चिंचवड) येथील जलतरण तलावाचे लवकरच होणार नूतनीकरण
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मोहननगर येथील राजर्षी शाहू महाराज जलतरण तलाव गेल्या चार वर्षांपासून बंद आहे. त्याचे अत्याधुनिक पद्धतीने नुतनीकरण करणे व इतर स्थापत्य विषयक सुधारणांची कामे करण्यासाठी स्थायी समितीची नुकतीच मान्यता दिली आहे.
हा तलाव करोनाच्या अगोदरपासून त्याची खोली 14 फूट असल्यामुळे ती कमी करण्यासाठी बंद आहे. क्रीडा विभाग आणि स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यामुळेच या तलावाचे काम गेल्या चार वर्षांपासून रखडले होते. मात्र, मोहननगर येथील जलतरण तलावाची तत्काळ दुरुस्ती करून सुरू करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.या मागणीची दखल घेत आयुक्त सिंह यांनी श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज जलतरण तलावाचे अत्याधुनिक पद्धतीने नुतनीकरण करणे व इतर स्थापत्य विषयक सुधारणांची कामे करण्यासाठी मान्यता दिली आहे.याबाबत विशाल काळभोर यांनी सांगितले की मोहननगर जलतरण तलावावर पोहण्यासाठी येणाऱ्यांची सातत्याने गर्दी असायची.
मात्र,गेल्या चार वर्षांपासून हा जलतरण तलाव बंद असल्याने खेळाडू, शालेय मुले, इतर नागरिकांची मोठी गैरसोय झाली. या जलतरण तलावातून महापालिकेला सर्वाधिक उत्पन्न मिळत होते.
आयुक्तांनीच याची दखल घेऊन हा तलाव सुरू करण्यासाठी पाउले उचलली आहेत, याबद्दल त्यांचे आपण मनापासून आभार मानतो.