September 23, 2023
PC News24
पिंपरी चिंचवड

चिखली पोलीस ठाण्याचे होणार हक्काच्या जागेत स्थलांतर

चिखली पोलीस ठाण्याचे होणार हक्काच्या जागेत स्थलांतर

आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून चिखली घरकूल येथील मोकळ्या जागेत पोलीस स्टेशन उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पोलीस स्टेशनच्या उभारणीकरता जागा उपलब्ध करण्याच्या प्रस्तावाला आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने चिखली से . क्र. 17 व 19 येथे आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी (EWS) प्रकल्प राबवला आहे. या प्रकल्पात एकूण 158 इमारती असून, 153 इमातींमधील लाभार्थींना सदनिकांचे वाटप करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकल्पातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या पोलीस स्टेशनसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली होती.वास्तविक, निगडी पोलीस ठाण्याचे विभाजन करुन चिखली पोलीस ठाण्याची निर्मिती केली आहे. सध्यस्थितीला चिखली पोलीस ठाणे स.नं. 774,एस.टी.पी. बिल्डिंग, सी व्हींग, पुर्णानगर, चिंचवड येथील जागेवर भाडेतत्त्वावर सुरू आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून प्राप्त सुधारित बांधकाम परवानगीनुसार चिखली से. क्र. 17 व 19 येथील घरकुल प्रकल्पामधील मुख्य प्रवेशद्वाराजवळील उजव्या बाजूची 2661.78 चौ. मी. इतकी जागा खेळाचे मैदान आरक्षण विकसित करण्याकरिता आरक्षित आहे.त्या जागेतील एकूण 15 गुंठे जागा पोलीस स्टेशनच्या उभारणीकरता उपलब्ध करण्याच्या प्रस्तावाला आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली. त्यामुळे चिखली पोलिस स्टेशनला हक्काची जागा मिळाली आहे.

Related posts

पिंपरी:अजमेरा मोरवाडी येथील भूखंडाची राज्याचे कामगार कल्याण मंत्री डॉ.सुरेश खाडे यांच्याकडून पाहणी.

pcnews24

मंगलमूर्तीची भाद्रपद यात्रा शनिवारपासून.

pcnews24

रावेत: ‘जीवनदायीनी’नद्यांवर प्रदूषणाचे संकट,पालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलावी अशी मागणी

pcnews24

गणेशोत्सव काळात मेट्रो सेवेची वेळ वाढवली.

pcnews24

गणेशोत्सव व ईदच्या पार्श्‍वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिस अलर्ट मोडवर

pcnews24

पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील वाहतूक पोलिसांसाठी ‘मेंटल वेलनेस प्रोग्राम’

pcnews24

Leave a Comment