September 23, 2023
PC News24
गुन्हा

रहाटणी: उद्योगात भागीदारी व नफ्याच्या आमिषाने पती-पत्नीला 14 लाखांचा गंडा

रहाटणी: उद्योगात भागीदारी व नफ्याच्या आमिषाने पती-पत्नीला 14 लाखांचा गंडा

टायर विक्रीच्या उद्योगात भागीदारी करणार असे सांगून महिन्याला 1 लाख रुपये व नफ्याच्या एक टक्का देण्याचा बहाणा करत पती-पत्नीला 14 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. हा प्रकार 5 जानेवारी 2021 ते 1 मे 2023 या कालावधीत रहाटणी येथे घडला आहे.

या प्रकरणी महिलेने फिर्याद दिली असून रिझवान दिलावर मणेर (रा.थेरगाव) याच्या विरोधात वाकड पोलिस ठाण्यात सोमवारी (दि.19) फसवणूकीचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपीने मेट्रो ट्रेडर्स अन्ड टायर्स या टायर विक्रीच्या व्यवसायात फिर्यादी व त्यांच्या पतीला पैसे गुंतवण्य़ास सांगितले.त्या बदल्यात महिन्याला 1 लाख व विक्रीच्या नफ्यावर एक टक्का परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणुक केली.

त्यानुसार त्याने फिर्यादी यांच्याकडून 14 लाख 13 हजार रुपये घेतले.मात्र भागीदारी किंवा करार नाम्यानुसार आजपर्यंत 1 लाख रुपये किंवा 1 टक्के नफा यापैकी काही दिले नाही. यावरून फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत.

Related posts

तळेगाव येथे पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकास अटक

pcnews24

एकतर्फी प्रेमाच्या त्रासाने १५ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या.

pcnews24

पुणे रेल्वे स्टेशच्या भुयारी मार्गात महिलेचा विनयभंग

pcnews24

पिंपरी चिंचवड मध्ये अजुन ही कोयत्याची दहशत.

pcnews24

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, पती फरार

pcnews24

खेड:टँकर चालकाने केली तेलाची परस्पर विक्री-चालकासह तिघांना अटक.

pcnews24

Leave a Comment