March 1, 2024
PC News24
गुन्हा

रागाच्या भरात टोळक्याने तरुणाच्या डोक्यात हत्याराने केला जीवघेणा वार

रागाच्या भरात टोळक्याने तरुणाच्या डोक्यात हत्याराने केला जीवघेणा वार

माण येथील माण रोड नजिक रात्री उशीरा सात ते आठ जण एकाला मारहाण करत होते. यावेळी एका तरुणाने त्याला तावडीतून सोडवले याचा राग आल्याने टोळक्याने तरुणाच्या डोक्यातच हत्याराने जीवघेणा वार केला.ही घटना रविवारी (दि.18) घडली.

याप्रकरणी सतिश विठ्ठल कांबळे (वय 32 रा.हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात पिर्याद दिली असून विशाल काकडे व त्याचे 7 ते 8 साथीदार यांच्यावर मारहाण व खूनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे थांबलेले असताना आरोपी व त्याचे साथीदार एकाला बेदम मारहाण करत होते . यावेळी फिर्यादी यांनी त्याला आरोपीच्या तावडीतून सोडवले.याचा राग येऊन आरोपींनी फिर्यादीलाच लाकडी काठ्या व हत्याराने मारहाण केली व डोक्यात वार करत गंभीर जखमी केले. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Related posts

हिंजवडी पोलिसांना सापळा रचून पकडला 31 किलो गांजा.

pcnews24

तळेगांव: आणखी दोन टोळ्यांवर मोका, रामा पाटील व कीटक भालेराव यांचा समावेश, पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई

pcnews24

पालिकेच्या भरती परीक्षेत हायटेक कॉपीचा प्रकार

pcnews24

पिंपरी चिंचवड:शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा राजीनामा द्या.

pcnews24

पुणे:दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवणारा बडोदावाला अटकेत.

pcnews24

रहाटणीच्या स्पा सेंटरवर छापा,दोन पिडीतांची सुखरूप सुटका.

pcnews24

Leave a Comment