September 23, 2023
PC News24
गुन्हा

पत्रकार रणजित इंगळे हत्या प्रकरणी चौकशीच्या मागणीचे निवेदन,कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा :पत्रकार संघ

पत्रकार रणजित इंगळे हत्या प्रकरणी चौकशीच्या मागणीचे निवेदन,कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा :पत्रकार संघ

दै.वृत्तरत्न सम्राटचे अकोल्याचे प्रतिनिधी प्रा.रणजित इंगळे यांची शनिवारी रात्री निर्घृण हत्या करण्यात आली.याचा निषेध नोंदविण्यासाठी चौथा स्तंभ संपादक पत्रकार व सोशल मीडिया संघ आणि पुणे,पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकारांनी आणि सामाजिक संघटनांच्या वतीने पुणे उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना संस्थापक अध्यक्ष विकास कडलक यांनी मागणीचे निवेदन दिले.

राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांचे कडे अकोला जिल्ह्याचे पालकत्त्व आहे त्या पार्श्वभूमीवर ही मागणी दोन्ही पायांनी दिव्यांग असलेले इंगळे अजात शत्रू होते. सामाजिक कार्याचा वसा चालविणारे आणि पत्रकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्यक्तिमत्वाची अशा प्रकारे हत्या होते ही गोष्ट संतापजनक आहे. संपुर्ण व्यवस्थेला हे एक प्रकारे आव्हानच आहे.

पत्रकारांच्या सुरक्षतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे याकडे सरकार लक्ष देईल का? प्रा.रणजीत इंगळे यांच्या हत्येची सीआयडी चौकशी करावी,प्रा.रणजीत इंगळे यांच्या कुटुबांला ५० लाखाची मदत करावी व आरोपीना पकडुन कठोर कारवाई करावी हि देखील मागणी यावेळी मागणी करण्यात आली.

या प्रसंगी संघटनेचे संस्थापक सचिव दिलीप देहाडे, पुणे जिल्हाध्यक्ष तथा सम्राटचे पुणे पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी दत्ता सूर्यवंशी, पुणे शहर अध्यक्ष विनोद बचुटे, उपाध्यक्ष सुनील गायकवाड, बाळासाहेब भालेराव, धम्मक्रांती महोत्स्व समिती अध्यक्ष इंद्रजित भालेराव, शाहू ,फुले, आंबेडकर विचार मंच विजय जाधव, पुणेकर माझा चॅनेलचे संपादक संतोष शिंदे, मुस्लिम नेते मैनुउद्दीन अत्तार, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद माने, पत्रकार यशवंत शिंदे यांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र जाहीर निषेध करून लवकरात लवकर मारेकऱ्यांचा उद्देश शोधून काढून पत्रकारांवर असे भ्याड हल्ले करण्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. कारवाई न झाल्यास पत्रकारांच्या स्वरक्षण करण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

Related posts

निगडी:केवळ चप्पल दुकानाबाहेर काढण्यास सांगितले आणि…?? व्यापाऱ्यांकडून बंदची हाक

pcnews24

कोयता गँगची पिंपरी-चिंचवड येथे दहशत

pcnews24

3,000 रुपयांसाठी कॉम्प्युटर इंजिनियरची हत्या.

pcnews24

पिंपरी चिंचवड:तरुणींच्या छेडछाडीबाबत पोलिस तात्काळ कारवाई करणार”- विनयकुमार चौबे- पोलिस आयुक्त.

pcnews24

सॉफ्टवेअर इंजिनिअर सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात, 7 लाख 14 हजार रुपयाला गंडा

pcnews24

पुण्यात आणखी दोन दहशतवाद्यांनाअटक; एक भूलतज्ज्ञ डॉक्टर आयसीसशी संबंधित.

pcnews24

Leave a Comment