योग करा आणि स्वस्थ रहा – मुख्यमंत्री
भारतासह जगभरात आज योग दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने आज मुंबईतील इंडिया गेट परिसरात योगाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कार्यक्रमात भाग घेतला. त्यांनी यावेळी उपस्थितांना व महाराष्ट्रातील जनतेला योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. योग करा आणि स्वस्थ रहा असा संदेशही त्यांनी दिला. तसेच त्यांनी उपस्थितांसोबत काही योगासने केली.