September 23, 2023
PC News24
महानगरपालिका

महानगरपालिका:बेशिस्तपणा व गैरवर्तन करणारे आरोग्य निरीक्षक सेवेतून निलंबित

महानगरपालिका:बेशिस्तपणा व गैरवर्तन करणारे आरोग्य निरीक्षक सेवेतून निलंबित

कामावर वेळेवर उपस्थित न राहणे,वरिष्ठांना न विचारता निघून जाणे,विनापरवाना गैरहजर राहणे, बैठकांना गैरहजर राहणे,अशा

प्रकारे कामात हलगर्जीपणा केल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य निरीक्षक सुनील वाटाडे यांना सेवेतून निलंबित केले आहे. फ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागात ते कार्यरत होते. मात्र, बेशिस्तपणे वागत असल्याने, गैरवर्तन करीत असल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तरीही कामात व वर्तनात सुधारणा न झाल्याने वाटाडे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी विभागीय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी शुक्रवारी (दि.15) दिले आहेत.

महापालिका अधिनियमातील कलम 56 (1) व 56 (2) फ नुसार व महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम 1979 च्या नियम 4 (1) (अ)चे अंतर्गत वाटाडे याचे निलंबन करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहे.

Related posts

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहाय्यक उद्यान निरीक्षकास लाच घेताना अटक तर कामावरून निलंबित

pcnews24

पिंपरी चिंचवड:नागरिकांना वेठीस धरणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका; संदीप वाघेरे यांची मागणी

pcnews24

पिंपरी चिंचवड : अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली 5 रस्त्यांसाठी 200 कोटींचा खर्च; रस्ते होणार अरुंद.

pcnews24

आजचे आपले राशीभविष्य !

pcnews24

पवना धरणातील पाणीसाठा केवळ 20 टक्‍क्‍यांवर… पाण्याचा काळजीपूर्वक वापर करा

pcnews24

स्मार्ट सिटी च्या अंतर्गत विविध रस्ते,आंतरीक रस्ते व सुरक्षिततेच्या दृष्टीने पत्रकारांन करता जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले.

pcnews24

Leave a Comment