March 1, 2024
PC News24
गुन्हा

दौंड: पत्नी व दोन मुलांचा खून करून डॉक्टरची आत्महत्या

दौंड: पत्नी व दोन मुलांचा खून करून डॉक्टरची आत्महत्या

पत्नी त्रास देते या कौटुंबिक वादातून शिक्षक पत्नी व दोन मुलांचा खून करुन डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना दौंड शहर परिसरात घडली.

डॉ. अतुल शिवाजी दिवेकर (वय 42 ), पल्लवी अतुल दिवेकर (वय 39), आदिवत अतुल दिवेकर (वय 9), वेदांती अतुल दिवेकर (वय 6) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

अतुल दिवेकर आणि कुटुंबीय दौंड शहरातील वरवंड परिसतील चैत्राली पार्क सोसायटीत राहायला होते.

डॉ. दिवेकर पशूवैद्यकीय तज्ज्ञ आहेत. त्यांची पत्नी पल्लवी एका शाळेत शिक्षिका आहे. मंगळवारी दिवसभर दिवेकर कुटुंबीयांचा घराचा दरवाजा बंद होता. त्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी घराचा दरवाजा वाजविला. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेजाऱ्यांनी दरवाजा उघडला. तेव्हा डॉ. अतुल यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. शेजारीच पल्लवी यांचा मृतदेह सापडला. त्यांचा गळा दोरीने आवळून खून करण्यात आला होता. पत्नी त्यांना त्रास देत होती असे बोलले जातेय.

या घटनेची माहिती दौंड पोलिसांना कळविण्यात आली. डॉ. अतुल यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली त्यात त्यांनी लिहिले आहे की

‘मी आत्महत्या करत असून पत्नी आणि दोन लहान मुलांचा खून केला आहे. मुलांचे मृतदेह शेजारी असलेल्या विहिरीत टाकून दिले आहेत’ पोलिसांच्या पथकाने त्वरीत चैत्राली पार्क परिसरात असलेल्या विहिरीजवळ धाव घेतली. विहिरीतील पाणी जास्त असल्याने मुलांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे.

Related posts

रहाटणी: सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेनी केली आत्महत्या

pcnews24

पुण्यात अडीच वर्षांत महिलांवरील गुन्हे वाढले, एकतर्फी प्रेमातून पाच जणींची हत्या तर काहीना धमकी, हल्ला.

pcnews24

मी आत्महत्या करतोय, माझा शोध घेऊ नका’ नक्की काय प्रकार आहे ?

pcnews24

चिटफंड भिशीमध्ये गुंतवणूकीत फसवणूक-16 लाख रुपयांचा अपहार.

pcnews24

भविष्यातला धोका नको म्हणून कायमचा संपवला! डोक्यात हातोडी मारून भंगार व्यवसायिकाचा खून- दोघांना अटक.

pcnews24

दुबईच्या नोकरी आमिषाने 70 हजाराची फसवणूक

pcnews24

Leave a Comment