September 28, 2023
PC News24
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय:एलॉन मस्क झाले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फॅन..पंतप्रधानांचा अमेरिका दौरा.

आंतरराष्ट्रीय:एलॉन मस्क झाले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फॅन..पंतप्रधानांचा अमेरिका दौरा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत.ट्विटरचे सीईओ तसंच टेस्लाचे एलॉन मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली, या भेटीनंतर मी खूप आनंदी असल्याचे मस्क यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्याशी मी जी चर्चा केली ती खूपच सकारात्मक स्तरावर झाली. तसंच पुढच्या वर्षी मी भारतात येण्याचाही विचार करतो आहे. मोदींच्या भेटीनंतर मी त्यांचा फॅन झालो आहे असंही एलॉन मस्क यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आणि मस्क यांची भेट अतिशय महत्त्वाची आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१५ मध्ये मस्क यांच्या कॅलिफोर्निया या ठिकाणी असलेल्या टेस्ला मोटर्सच्या फॅक्टरीतही त्यांना भेटले होते. त्यावेळी मस्क हे ट्विटरचे सीईओ नव्हते. बुधवारी या दोघांची पुन्हा एकदा भेट झाली. टेस्ला मोटर्स ही कंपनी भारतात कारखाना सुरु करण्याच्या दृष्टीने जागेच्या शोधात आहे. त्या पार्श्वभूमीवर एलॉन मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेली ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे.

Related posts

आंतरराष्ट्रीय:स्वत:ला अल्लाचे गुलाम म्हणा, अन्यथा…मलेशियन एअरलाईन्सच्या विमानात धमकी.

pcnews24

आंतरराष्ट्रीय:रशियाचं यान “लुना २५” चंद्रावर क्रॅश;चांद्रमोहीमेला मोठा धक्का

pcnews24

अंजूला भारतात परतायची इच्छा;सध्या पाकिस्तानात खूष पण…

pcnews24

लिंडा याकोरिनो ट्विटरच्या नवीन CEO ?

pcnews24

तिसऱ्या कारकिर्दीत भारत जगातील सर्वोत्तम तिसरी अर्थव्यवस्था होईल; मोदींचा निर्धार

pcnews24

रोमहर्षक सामन्यात श्रीलंकेवर मात करून भारतीय संघ आशिया कपच्या अंतिम फेरीत दाखल

pcnews24

Leave a Comment