September 23, 2023
PC News24
गुन्हा

वाकड:चार वर्षीय मुलगी गायब आणि अपहरणाचा कॉल

वाकड:चार वर्षीय मुलगी गायब आणि अपहरणाचा कॉल

वाकड येथील शाळेतून एका चार वर्षाच्या मुलीचे अपहरण झाल्याचा कॉल पोलिस हेल्पलाईन 112 वर आला आणि वाकड पोलिसांची एकच धावपळ उडाली. एका पादचारी व्यक्तीने तिला पोलीस चौकीत आणले आहे असे समजताच पोलिसांचा जीव भांड्यात पडला. अशा प्रकारे मुलीचे अपहरण झाले नसून ती खेळता खेळता शाळेच्या आवारातून बाहेर पडली होती असे समजले आहे.

चार वर्षीय मुलगी थेरगाव येथील सेंट एलिया हायस्कूल या शाळेत ज्युनिअर केजीमध्ये शिकत आहे. मंगळवारी (दि. 20) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास ती शाळेत आवारात खेळत असताना अचानक बाहेर पडली. मुलगी शाळेत दिसेना म्हणून शाळा व्यवस्थापनाने तिच्या घरच्यांना फोन केला. मात्र, ती घरी देखील नसल्याचे समजताच शाळेकडून हेल्पलाईन 112 वर आरोहीचे अपहरण झाल्याचा कॉल करण्यात आला.

पोलिसानी घटनेची गांभीर्याने दखल घेतली. वाकड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, वाकड डीबी पथकातील अधिकारी, कर्मचारी असा पोलिसांचा मोठा फौजफाटा थेरगाव येथील शाळेच्या परिसरात दाखल झाला.शाळेच्या परिसरातून बाहेर जाणाऱ्या मार्गांवर पोलिसांनी नाकाबंदी केली. शाळेतील आणि बाहेरच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु केली.

सहायक पोलीस आयुक्तांच्या मदतीने तपासाची पुढील दिशा आखत असतानाच थेरगाव चौकीतून माहिती आली की, चार वर्षांच्या एका मुलीला एका पादचाऱ्याने थेरगाव चौकीत आणून सुपूर्द केले आहे. पालकांसह पोलीस थेरगाव चौकीत आले. आईला पाहताच मुलगी तिच्या आईच्या कुशीत विसावली. मुलगी सापडल्याचे समजताच पोलिसांचा जीव भांड्यात पडला.

Related posts

कोयत्याच्या धाकाने नागरिकांना लुटणारी टोळी वाकड पोलिसांनी पकडली

pcnews24

पिंपरी चिंचवड:संघटित गुन्हेगारी करणाऱ्या करण रोकडे, बाबा शेख, अनिल जाधव टोळ्यांवर मोका अंतर्गत कारवाई : पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे.

pcnews24

जास्तीचे पैसे लावण्यावरून जाब विचारला, म्हणून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची ग्राहकाला मारहाण

pcnews24

वाकड: बिल्डर वर फसवणुकीचा गुन्हा, साडे पन्नास लाखांची फसवणूक, नक्की प्रकार काय ?

pcnews24

केवळ पाचशे रुपयांसाठी पेव्हर ब्लॉकने मारहाण

pcnews24

चिंचवड:अज्ञाताच्या फोनने ज्येष्ठ नागरिकाचे बँकेतून दिड लाख लंपास

pcnews24

Leave a Comment