पिंपरी चिंचवडच्या विद्यार्थ्यांना मिळणार PMPML कडून अनुदानित पासेस
पीएमपीएमएल कडून, पिंपरी- चिंचवड महापालिका हद्दीतील अनुदानीत पासेसचे वितरण 15 जून पासून सुरु करण्यात आले आहे.पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेतील इ. 5 वी ते 10 वी चे विद्यार्थ्यांना सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता 100% अनुदानित मोफत बस तर खाजगी शाळेतील (पीसीएमसी हद्दीतील) इयत्ता 5 वी ते 10 वी चे विद्यार्थ्यांना 75% सवलतीचे बस प्रवास पासेस वितरणाची योजना सुरु करण्यात आली असून पास साठी दि. 15 जून पासून सर्व आगारामध्ये तसेच पासकेंद्रावर अर्ज वितरीत केले जात आहेत.
संबंधित शाळा अथवा त्यांचे प्रतिनिधी हे त्यांचे शाळेतील विद्यार्थ्यां करिताचे अर्ज महामंडळाच्या कोणत्याही आगारांमधून एकत्रित रित्या घेवून जाऊ शकतात व हे अर्ज एकत्रित रित्या आगारामध्ये जमा केल्यास त्या शैक्षणिक संस्थेस एकत्रित पास दिले जातील.यामुळे सर्व विद्यार्थ्यांना आगारामध्ये येण्याची गरज भासणार नाही.
खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना महामंडळाचे आगारामधून त्यांचा अर्ज व कागदपत्रांची तपासणी झाल्यावर त्यांचे प्रवासाचे अंतरानुसार होणारे एकूण पासचे रकमेचे 25% रकमेनुसार चलन तयार करून देणेत येईल ते चलन विद्यार्थ्यांनी पिंपरी -चिंचवड मनपा हद्दीतील बँक ऑफ बडोदा चे कोणत्याही शाखेमध्ये भरणा केले नंतर अर्जासोबत चलन व आवश्यक कागदपत्रे जोडून जवळच्या आगारामध्ये सादर केल्यावर पास मिळू शकेल.
या योजनेसंबधी सविस्तर माहिती महामंडळाच्या सर्व आगारामध्ये उपलब्ध आहे. तरी पिंपरी चिंचवड महापालिका शाळेतील व पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांनी या सवलतीच्या पासचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे. तसेच अधिक माहिती हवी असल्यास पालकांना व शाळांना 020-24545454 या क्रमांकावार संपर्क साधता येणार आहे.