वानवडी :रिक्षाचालकाचा तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न : वानवडी येथील घटना
प्रवासी म्हणून रिक्षात बसलेल्या एका तरुणीवर रिक्षा चालकाने बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला. दि 20 जून रोजी वानवडी येथील काळेपडळ रेल्वे गेटच्या जवळ ही घटना घडली.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तरुणी एका , खाजगी कंपनीत नोकरीला आहे. 20 जून रोजी काम संपवून घरी जाण्यासाठी ती आरोपीच्या रिक्षात बसली होती. रिक्षाचालकाने घरी जाण्यासाठी नेहमीच्या रस्त्याने रिक्षा न घेता निर्जन मार्गाने रिक्षा चालवत अंधाऱ्या ठिकाणी घेऊन गेला व रस्त्याच्या कडेला रिक्षा थांबवून आरोपीने फिर्यादीच्या तोंडावर हात ठेवून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण प्रकारानंतर फिर्यादीने तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वानवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
29 वर्षीय तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार रिक्षा चालक अनिकेत रिशू कुमार (वय 24, शिवचैतन्यनगर, फुरसुंगी) याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.