चिंचवड:पत्नी व तिच्या घरच्यांकडून पतीचा घटस्फोटासाठी छळ, पतीची आत्महत्या
घटस्फोटासाठी पतीचा शारीरिक व मानसिक छळ करत त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी व तिच्या घरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 31 डिसेंबर 2022 ते 14 जून 2023 या कालावधीत परभणी व चिंचवड येथे घडला.
मयत पतीचे वडील लक्ष्मण संभाजी पात्रे (वय 65 रा. चिंचवड) यांनी मंगळवारी (दि.20) फिर्याद दिली आहे.शंकर लक्ष्मण पात्रे (वय 32) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.मयत व्यक्तीची पत्नी, सासू, रमेश महादू धुमाळ (वय 65 रा. परभणी), गणेश रमेश धुमाळ (वय 40), विशाल रमेश धुमाळ (वय 23) व अजून दोन महिला आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलाला आरोपी पत्नीने व तिच्या घरच्यांनी ओळखीच्या लग्नासाठी म्हणून बोलावून घेतले व त्याच्याकडून 10 हजार रुपये काढून घेतले. तसेच घटस्फोट दे म्हणत शारीरिक व मानसीक छळ केला.शिवीगाळ करून त्रास दिला. या त्रासाला कंटाळून फिर्यादीच्या मुलाने गळफास घेत आत्महत्या केली. यावरून पत्नी व तिच्या घरच्यांच्या विरोधात पिंपरी पोलीस(Chinchwad) स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.