September 28, 2023
PC News24
धर्म

पुणे:यंदाच्या गणेशोत्सवा निमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर साकारणार अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती

पुणे:यंदाच्या गणेशोत्सवा निमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर साकारणार अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टतर्फे 131 व्या वर्षाच्या गणेशोत्सवा निमित्त अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.

पुढील वर्षी सन 2024 मध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिराची उभारणी पूर्ण होत आहे, यापार्श्वभूमीवर पुण्याच्या गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे यंदा होणारी श्रीराम मंदिराची प्रतिकृती लक्षवेधी ठरणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दगडूशेठ तर्फे यंदा करण्यात येणारी श्रीराम मंदिराची प्रतिकृतीची सजावट केवळ भारतातीलच नाही, तर जगभरातील श्री गणेश व प्रभू श्रीराम भक्तांसाठी पर्वणी ठरणार आहे. मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार 125 फूट लांब, 50 फूट रुंद आणि 100 फूट उंच असणार आहे. लाकूड, बॅटम, प्लायवूड आदी साहित्य वापरुन त्यानंतर रंगकाम करण्यात येणार आहे. तसेच शेवटच्या टप्प्यात त्यावर दिवे देखील बसविण्यात येणार आहेत.प्रतिकृतीमध्ये 24 खांब व 24 कमानी उभारण्यात येणार आहेत. मंदिराचा मुख्य घुमट 100 फुटांपेक्षा उंच असून ध्वजासहित सुमारे 108 फूट उंच मंदिर असेल. याशिवाय मंदिराचे छोटे आणि मोठे असे रेखीव 11 कळस असणार आहेत.मुख्य सभागृहात श्रीगणरायाचे मखर सोनेरी रंगाच्या छटांमध्ये असून सभोवती सुशोभित कमानी असणार आहेत. मंदिर परिसर व मार्गामध्ये रामायणातील घटनांचा आढावा चित्र व लेखन स्वरुपात मांडण्यात येणार आहे. बेलबाग चौकातून प्रवेश करताना काल्पनिक रामसेतू उभारण्यात येणार आहे. तेथून भाविकांना मंदिरात प्रवेश करता येईल, हे देखील यंदाचे आकर्षण असणार आहे. याशिवाय भगवान श्रीराम, प्रवेशद्वारावर श्री हनुमंत आणि वानरसेनेच्या प्रतिकृती देखील लक्षवेधी ठरणार आहेत.

सजावट विभागात 100 कारागिर दिवस-रात्र सलग 75 दिवस कार्यरत राहणार आहेत. मंदिराची प्रतिकृती फायबर मध्ये उभारण्यात येणार असून त्यावर रंगकाम करण्यात येईल.मुख्य सभामंडपातील खांबांची रचना आणखी सुटसुटीत करण्यात येत असून यामुळे भाविकांना लांबून देखील सहजतेने श्रीं चे दर्शन घेणे शक्य होणार आहे. कलादिग्दर्शक अमन विधाते यांनी मंदिराचे व विद्युत रोषणाईचे काम वाईकर बंधू, मंडप व्यवस्था काळे मांडववाले यांनी केली आहे.

Related posts

मणिपूरमध्ये पुन्हा तणाव; इंटरनेट बंद तर शाळांना सुट्टी

pcnews24

तुळजाभवानी मंदिर परिसराचं रुप पालटणार,राज्य सरकारचा मोठा निर्णय,मंदिरासाठी१३८५ कोटींचा निधी मंजूर.

pcnews24

जी-२० सदस्यांचा वारी सोहळ्यात सहभाग.’याची देही याची डोळा’ अनुभवली वारी (काही खास क्षणचित्रे)

pcnews24

छ. संभाजीनगर: महाविकास आघाडीच्या सभेच्या दिवशीच भाजपची ‘सावरकर सन्मान रॅली’

Admin

राज्यात अनेक ठिकाणी बंदची हाक.

pcnews24

श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्टतर्फे यंदा अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती तर प्राणप्रतिष्ठा सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते

pcnews24

Leave a Comment