February 26, 2024
PC News24
कला

आपला इतिहास बदलण्याचे षडयंत्र करणाऱ्या ‘आदिपुरुष’ वर बंदी घालण्याची मागणी,खासदार श्रीरंग बारणे यांचे निवेदन

आपला इतिहास बदलण्याचे षडयंत्र करणाऱ्या ‘आदिपुरुष’ वर बंदी घालण्याची मागणी,खासदार श्रीरंग बारणे यांचे निवेदन

भारतीय संस्कृतीची खिल्ली उडविणाऱ्या व चित्रपटात अशोभनीय संवाद असलेल्या‘आदिपुरुष’चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारे निवेदन शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांना दिले आहे.

चित्रपटात सीता, हनुमान आणि रावण यांना चुकीच्या पद्धतीने चित्रीत केले असून यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

याबाबत दिलेल्या निवेदनात बारणे यांनी म्हटले आहे की, ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष हा चित्रपट आहे. हा चित्रपट हिंदी, तेलगू अशा दोन भाषांमध्ये चित्रीत करण्यात आला आहे.हिंदू धर्मांची कथा पूर्णपणे चुकीच्या आणि अशोभनीय पद्धतीने दाखवली गेली आहे. त्यामुळे या चित्रपटावर देशभरात बंदी घालावी. निर्माता, कलाकारांवर कायदेशीर कारवाई करावी.चित्रपटात श्री हनुमानाच्या व्यक्तीरेखेला अपमानास्पद संवाद देण्यात आले आहेत. चित्रपट निर्मात्यांनी हा चित्रपट रामायणावर आधारित असल्याचे वर्णन केले आहे. परंतु, त्यातील एकही पात्र आपल्या धर्माच्या नियमांनुसार नाही.

सनातन आस्था आणि सनातनप्रेमींचे हृदय दुखावणारे असे संवाद चित्रपटात आहेत. चित्रपटात दाखवण्यात आलेली सर्व पात्रे रामायणाच्या कथेच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत. हा चित्रपट म्हणजे आपला इतिहास बदलण्याचे षडयंत्र आहे. हिंदु धर्मीयांच्या भावना दुखावल्याने नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे. त्यामुळे आदिपुरुषवर देशभरात बंदी घालावी. निर्माता आणि कलाकारांवर कारवाई करण्याची मागणी बारणे यांनी केली आहे.

Related posts

सिंधी भाषिकांसाठी अनोखी कार्यशाळा !!!

pcnews24

संघ परिचय वर्ग व साहित्यिक मिलन कार्यक्रमास पिंपरी चिंचवडचे मान्यवर ४० साहित्यिक उपस्थित.

pcnews24

आजच्या पिढीची थरारक साहित्याला पसंती – कवी सौमित्र

pcnews24

एका फोन कॉलनं बदललं आयुष्य,अभिनेत्रीला मिळाली नवी संधी

pcnews24

स्वरसागर महोत्सवातील उद्बोधक नृत्य कार्यक्रमांना रसिकांची विशेष पसंती.

pcnews24

नितीन गडकरींची भुमिका साकारणार ‘हा’ अभिनेता

pcnews24

Leave a Comment