September 28, 2023
PC News24
खेळ

श्री मोरया गोसावी समाधी मंदिर पटांगणात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

श्री मोरया गोसावी समाधी मंदिर पटांगणात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

सोहम योगसाधना,पवना ग्रुप आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती,पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रम सकाळी 6 ते 7 या वेळेत श्री मोरया गोसावी समाधी मंदिर पटांगण चिंचवड येथे आयोजित करण्यात आला.यावेळी सोहम योग साधनाचे, दिगंबर उचगांवकर यांनी योग साधनेचे महत्व पटवून सांगितले.भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यामध्ये योग, योगासने, योगसाधना आणि सूर्यनमस्कार यांना अनन्यसाधारण महत्व आहे. प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधु संत यांनी योगाचे महत्व त्यांचे फायदे, त्याची गरज पटवून दिलेली आहे.आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपले शरीर तंदुरुस्त ठेऊ शकतो. शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजेच योग होय.गिरीश प्रभुणे यांनी उपस्थित योगसाधकांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करून अश्विनी चिंचवडे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड सतीश गोरडे यांनी केले. या कार्यक्रमात ३०० हून अधिक योगसाधकांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमास डॉ. नीता मोहिते, रविंद्र नामदे, रश्मी उचगांवकर, पुष्पा जाधव, जगताप सर, अतुल आडे, व इतर मान्यवर आणि सोहम योग साधना वर्गाचे साधक उपस्थित होते.

Related posts

धरणे धरणारे खेळाडू भारताची प्रतिमा डागाळत आहेत: पी.टी. उषा. भारतीय ऑलिम्पिक संघ अध्यक्ष.

pcnews24

विजयानंतर द्वितीय स्थान लखनऊ ने राखीव केले

pcnews24

अमॅच्युअर स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्र आयोजित निवड चाचणी स्पर्धा यशस्वीपणे संपन्न.

pcnews24

अभिश्री राजपूतची श्रीलंका युथ एशियन योगा गेम्ससाठी “भारतीय संघाची कोच” म्हणून निवड.

pcnews24

आंतरराष्ट्रीय योग दिन :आझम कॅम्पस येथे आज ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ उत्साहात साजरा

pcnews24

BREAKING – हाँकी ज्युनिअर मध्ये  भारताचा शानदार विजय

pcnews24

Leave a Comment