60 हजार घरात ‘घर चलो अभियान’, पिंपरी विधानसभा क्षेत्रात भाजपाचा उपक्रम
केंद्र सरकार व राज्य सरकारद्वारे झालेल्या विविध लोक कल्याणकारी योजना, केलेली कामे लोकांपर्यंत पोहचवावी यासाठी पिंपरी विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाद्वारे 60 हजार घरात ‘घर चलो अभियान’ आयोजित करण्यात आल्याची माहिती पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मोदी@9 उपक्रमा अंतर्गत पिंपरी विधानसभा परिसरात व्यापारी संमेलन, सोशल मिडिया बैठक, जागतिक योग दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तसेच 23 जून रोजी डॉ. शामा प्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी बलिदान दिवस, जेष्ठ नागरिक संमेलनविषयी नियोजन सुरु आहे.
सेवा, सुशासन व गरीब कल्याण हेतू असलेल्या भाजपा संघटनद्वारे विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या समस्यांची नोंद घेणार आहेत, तसेच प्रलंबित कामे गतिशील व्हावी यासाठी प्रशासकीय अधिकारी व शासन यांच्या मदतीने प्रयन्त केले जातील असे आमदार उमा खापरे यांनी सांगितले.
येणाऱ्या काळात पिंपरी विधानसभेतील भाजपाचे आजी माजी सर्व नगरसेवक, आघाडी मोर्चा पदाधिकारी, बूथ कार्यकर्ते सर्व संघटीत होऊन केंद्र व राज्य सरकारच्या लोक कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोचवण्याचे काम करणार आहेत, तसेच जनता व सरकार मधला दुवा होउन विकास कामांना गती देण्याचे काम करतील अशी माहिती प्रदेश कार्यकारी सदस्य सदाशिव खाडे यांनी दिली.