September 28, 2023
PC News24
गुन्हा

‘Life story’ दर्शना पवारचा व्हिडिओ व्हायरल.

‘Life story’ दर्शना पवारचा व्हिडिओ व्हायरल

मित्रासोबत राजगडला ट्रेकिंग साठी गेलेली तरुणी दर्शना पवार, जी दर्शना ही तिसऱ्या क्रमांकाने एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाली होती, ती परत आलीच नाही.दरम्यान याच दर्शनाच्या भाषणाचा एक व्हिडिओ आता व्हायरल होतोय.

दर्शनाचे वनविभागाच्या परीक्षेत सिलेक्शन झाल्यानंतर पुण्यात तिचा स्पॉटलाईन अकॅडमी मध्ये सत्कार करण्यात आला. या सत्कार नंतर तिने एक भाषण केलं होतं. त्याचाच व्हिडिओ आता व्हायरल होतोय. या व्हिडिओत बोलत असताना दर्शना म्हणते की, प्रत्येकाच्या ‘लाईफ ची एक स्टोरी’ असते. परंतु ती स्टोरी ऐकण्यासाठी लोक तेव्हाच उत्सुक असतात जेव्हा ती स्टोरी सक्सेस भरून आपल्याकडे येते.आपण शाळा महाविद्यालयात चांगला परफॉर्मन्स करतोय,म्हणून आज एवढे सत्कार होत आहेत, अनेक लोक आपल्याशी येऊन बोलतात, ते आपल्या मुलींना घेऊन येतात आणि विचारतात की सांगा अभ्यास कसा केला पाहिजे.

आपण एखादी गोष्ट साधी केलेली असते तेव्हा त्यात मात्र अनेक लोकांचा हात असतो. परंतु आपण जेव्हा अपयशी ठरतो तो दोष आपला असतो. या भाषणात दर्शना अपयशाबद्दल देखील खूप काही बोलून गेली.

दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्यानंतर त्याचा मित्र राहुल हंडोरे अद्यापही बेपत्ता आहे. दर्शना पुण्यात सत्कार झाल्यानंतर 12 जून रोजी राहुल सोबत राजगड किल्ल्याच्या परिसरात ट्रेकिंग साठी गेली होती. दोघेही दुचाकीवरून त्या ठिकाणी गेले होते. मात्र त्यानंतर दर्शनाचा मृतदेह सापडला. ही घटना घडली तेव्हापासून राहुल हंडोरे बेपत्ता आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Related posts

डोमिनोज पिझ्झाचे अधिकृत स्टोअर देतो असे सांगत एक कोटी रुपयांची फसवणूक

pcnews24

अज्ञात चोरट्यांनी कंपनीसमोर पार्क केलेल्या ट्रकमधून केली एक लाखांची चोरी

pcnews24

दहशतवाद्यांनी जंगलात केली बॉम्बस्फोटाची चाचणी- एटीएस पथकाची माहिती

pcnews24

पिंपरी: पश्चिम बंगालच्या तरुणीचा विनयभंग,पिंपरी महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या माजी सभापती विरुद्ध गुन्हा दाखल.

pcnews24

अरे बापरे,पिंपरी-चिंचवडमध्ये 401 अपघात !!! 

pcnews24

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, पती फरार

pcnews24

Leave a Comment