September 23, 2023
PC News24
गुन्हा

MPSC टॉपर दर्शना पवार हत्या प्रकरणातील मित्र राहुल हंडोरेला मुंबईत अटक

MPSC टॉपर दर्शना पवार हत्या प्रकरणातील मित्र राहुल हंडोरेला मुंबईत अटक

एमपीएससी टॉपर दर्शना पवार हिच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी तिचा मित्र राहुल हंडोरेला अखेर अटक केली आहे.वेगवेगळ्या राज्यांमध्ये फिरत असलेल्या राहुलला अखेर मुंबईत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांनी शिताफीने राहुलला ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. दर्शनाची हत्या केल्याची कबुली राहुलने दिल्याची माहिती आहे. तिचा खून झाल्याचे शवविच्छेदन अहवातून स्पष्ट झाले होते.

दर्शना पवार आणि राहुल हंडोरे हे एकमेकांचे दूरचे नातेवाईक आहेत. गेली अनेक वर्ष ते एकमेकांना ओळखतात. दर्शनासोबत लग्न करण्याची राहुलची इच्छा होती. परंतु नात्यात असल्यामुळे पवार कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता. घरच्यांनी तिचं इतरत्र लग्न ठरवलं होतं. दर्शनाने नुकतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण केली. तर दुसरीकडे राहुल मात्र परीक्षेत अपयशी झाला होता. त्यातच लग्नाला कुटुंबीयांचा विरोध असल्याच्या रागातूनच राहुलने दर्शनाची हत्या केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. आज दुपारी पुण्याचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल पत्रकार परिषद घेऊन याविषयी सविस्तर माहिती देणार आहेत.

१२ जून रोजी सिंहगडावर जायचे आहे, असं मैत्रिणीला सांगून घराबाहेर पडलेल्या दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत राजगडावर मिळाला होता. त्यानंतर राहुल फरार होता. आज पोलिसांनी त्याला अटक केल्यामुळे त्यावर पडदा पडला आहे. पोलिस पूर्ण घटनाक्रमाची कसून चौकशी करत आहेत.

Related posts

सावधान!पुणे मुंबई महामार्गावर अडवून होते लुटमार.

pcnews24

शहरातील पाच मोठ्या मॉलला नोटीसा.

pcnews24

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी अजूनही आरोपपत्र नाही

pcnews24

पिंपरी व्यावसायिकाला धमकी …जबरदस्ती हप्ता देण्याची मागणी

pcnews24

तळेगाव येथे पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकास अटक

pcnews24

पत्नी आणि सासुरवाडीचा त्रास, पतीचा गळफास; पुण्यात हडपसर येथील घटना

pcnews24

Leave a Comment