लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची एनसीपी ला सोडचिठ्ठी, हैदराबादमध्ये BRS पक्षात प्रवेश
सुरेखा यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या धुमधडाक्यात प्रवेश केला होता. त्यांनी BRS पक्षात प्रवेश करत सगळ्यांना चकीत केलं आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी हैदराबाद येथील भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे सगळीकडे नवीनच चर्चा रंगली आहे.यापूर्वी प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. आता सुरेखा यांनीही पक्ष सोडत थेट हैदराबाद येथील पक्षात प्रवेश केला आहे.
‘Life story’ दर्शना पवारचा व्हिडिओ व्हायरल.
सुरेखा पुणेकर या दोन दिवसांआधीच हैद्राबादमधील डेरे येथे दाखल झाल्या होत्या. त्यासंदर्भात त्यांनी अनेक भेटीगाठीही केल्या. सुरेखा यांना विधानसभा निवडणूका लढवायच्या असल्याचं त्यांनी सांगितलं. मोहोळ किंवा देगूलूरमधून बीआरएसच्या तिकिटावर सुरेखा पुणेकर लढण्याची शक्यता आहे. सुरेखा या ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभागी झाल्या होत्या. बिग बॉसमुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या आणि त्यानंतरच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.आता त्यांच्या या निर्णयाने एनसीपीला किती तोटा होतो हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.