सॉफ्टवेअर इंजिनिअर सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात, 7 लाख 14 हजार रुपयाला गंडा
भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत पुण्यातील एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाला सेक्स्टॉर्शनमध्ये अडकवून त्याच्याकडून 7 लाख 14 हजार रुपये उकळल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी 33 वर्षीय तरुण आंबेगाव या भागात राहायला असून तो स्वतः एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. फिर्यादी तरुणाला एका महिलेचा व्हिडीओ कॉल आला. कॉल चालू असताना तिने आपल्या अंगावरचे कपडे उतरवले. ते पाहत असल्याचे स्क्रीन शॉट या महिलेने काढले. हे स्क्रीन शॉट व व्हिडीओ त्याच्या मित्रांना पाठविण्याची तिने धमकी दिली.
त्यानंतर दिल्ली सायबर कमिशनर श्रीवास्तव बोलत आहे, असे त्याला फोन आले. पोलिसांना तपास करण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे, अशी वेगवेगळी कारणे सांगून त्या महिलेने फिर्यादीकडून वेळोवेळी 7 लाख 14 हजार रुपये उकळले. शेवटी या तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली. भारती विद्यापीठ पोलिस अधिक तपास करीत आहेत.