‘आदिपुरुषच्या टीमला जिवंत जाळले पाहिजे’ अभिनेते मुकेश खन्ना यांनी पुन्हा एकदा आदिपुरुष चित्रपटावर आपला संताप व्यक्त केला आहे. “त्यांना माफ करू नका, यांच्या संपूर्ण टीमला जिवंत जाळले पाहिजे, तुम्ही असा चित्रपट करणार आणि लोकांनी त्याला विरोध करू नये असे तुम्ही म्हणू शकत नाही, मनोज मुंतशीर हा माणूस स्वतःला काय समजतो, तुझ्या पद्धतीने तू रामायणाची व्याख्या करू शकत नाहीस”, असे ते म्हणाले. दरम्यान आदिपुरुषमध्ये डॉयलॉग बदलण्यात आले आहे.