एमआयडीसी भोसरी डीपी रोडवरील बाधित व्यावसायीकांना चऱ्होली गावात जागा
एमआयडीसी भोसरी भागातून जाणाऱ्या डीपी रोडमुळे अनेक व्यवसायिक बाधित झाले आहेत. त्यांची ही समस्या लक्षात घेवून त्या डीपी रोडवरील बाधित 92 व्यावसायीकांना चऱ्होली गावात 10 एकर जागा देण्यात येणार आहे.हे व्यावसायीक ताबडतोब स्थलांतरण करु शकतात,असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
मंत्री सांमत म्हणाले, विकास आराखड्यामध्ये रोड गेल्याने एमआयडीसी भागातील 92 व्यावसायिकांचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे व्यावसायिक अनेक बेरोजगारांना रोजगार देत आहेत. त्यामुळे त्यांना वाऱ्यावर सोडता येणार नाही. त्यांच्यासाठी चहोली परिसरात 10 एकर जागा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. व्यावसायिकांना किती जागा द्यायची हे असोसिएशन ठरविणार आहे. त्यानुसार जागा ताब्यात देण्याचा बोर्डाचा ठराव चार दिवसात होईल. मात्र, ठरावासाठी व्यावसायिकांना थांबण्याची आवश्यकता नाही. एमआयडीसीसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे बांधून देण्यात येणार असल्याचेही मंत्री सामंत यांनी सांगितले.