सरकारची कमाई झाली दुप्पट
सरकारने महामार्गाच्या टोलमधून कोट्यवधींची कमाई केली आहे. सरकारने मागील 6 महिन्यांमध्ये फास्टॅगमधून 28180 कोटी रुपये कमावले आहेत. यावर्षीच्या फास्टॅगच्या कमाईत 46% वाढ झाली. ती 34778 कोटींवरून 50855 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. देशामध्ये 7.06 कोटी वाहनांवर फास्टॅग लावण्यात आले आहे. देशातील 964हून अधिक टोलनाक्यांवर फास्टॅग प्रणाली सुरु करण्यात आली आहे. या फास्टॅगला पाच वर्षाची मर्यादा देण्यात आली आहे.