September 28, 2023
PC News24
सामाजिक

पवना व इंद्रायणी नदी स्वच्छतेच्या कामाला तत्वतः मंजुरी – उदय सामंत

पवना व इंद्रायणी नदी स्वच्छतेच्या कामाला तत्वतः मंजुरी – उदय सामंत

मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी नदी सुधारचा प्रश्न प्राधान्याने हाती घेतल्यानंतर पवना व इंद्रायणी नदी स्वच्छतेच्या प्रश्न सरकारने गांभीर्याने घेतला आहे. नदी सुधारचा डीपीआर तयार करुन दोन ते तीन वर्षात काम पूर्ण होईल. या कामाला तत्वतः मंजुरी दिल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.उगमस्थानापसूनच नदी प्रदुषित होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे.एमआयडीसीतील रसायनमिश्रित पाणी नदीपात्रात सोडू नये अशा सूचना अधिका-यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

उद्योगमंत्री सामंत यांनी आज (गुरुवारी) पिंपरी महापालिकेत पवना, इंद्रायणी नदी स्वच्छतेबाबत बैठक घेतली. बैठकीला महापालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद, एमआयडीसीचे सीईओ बिपीन शर्मा, महापालिका अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ आदी उपस्थित होते.

मंत्री सामंत म्हणाले नदी सुधारसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. त्यामध्ये खासदारांचा समावेश असेल. नदी सुधारचा आराखडा तयार करण्याचे निर्देश केले आहेत. तीन महिन्यांत आराखडा तयार होईल. कामासाठी एक ते दीड हजार कोटी खर्च येवू शकतो.

त्याचा भार एमआयडीसी, महापालिका उचलणार आहे. अतिरिक्त निधी लागला तर तो निधी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.नदी स्वच्छ ठेवण्याची वारकऱ्यांची मागणी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले

Related posts

क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या स्मारकासाठी 41 कोटींचा निधी : मुख्यमंत्री

pcnews24

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा “निकाल’ लांबणीवर,सुप्रीम कोर्टातील ४ न्यायाधीशांना कोरोनाची लागण.

pcnews24

मुंबई:उद्योगपती रतन टाटा यांना पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान.

pcnews24

अतिक्रमण हटवण्याचे काम करताना महिला पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ व मारहाण

pcnews24

अमित शाह पुण्यात दाखल…

pcnews24

राज्यात पुन्हा एकदा पावसाचं आगमन;वाचा कुठे येलो अलर्ट आणि कुठे ऑरेंज अलर्ट

pcnews24

Leave a Comment