अरे बापरे!! पावसाळ्यात ‘या’ ठिकाणी पर्यटकांना बंदी
रायगडच्या माणगावमधील पर्यटन स्थळांवर पावसाळ्यात पर्यटकांना बंदी घालण्याचा निर्णय येथील प्रांताधिकारी उमेश बिरारींनी घेतला आहे. अनेकांची पसंती असणाऱ्या ताम्हिणी घाट, देवकुंड धबधबा व सिक्रेट पॉइंट येथे पर्यटकांना जाता येणार नाही. बंदीचा हा आदेश 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत लागू राहणार आहेत. मागील काही वर्षात या भागांत झालेल्या दुर्घटना पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. या परिसरात कलम 144 ही लागू केले आहे.