बरड ता.फलटण येथे माऊली, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले दर्शन
देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे दर्शन काल दि. 22 जून रोजी घेतले. पालखी सातारा जिल्ह्यातील बरड येथे होती.माऊलींच्या पालखीचे सारथ्य देखील फडणवीसांनी केले.
हरी नामाच्या गजरात आणि लाखो भाविक वारकऱ्यांसह संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींची पालखी मजल दर मजल करत आळंदीहून पंढरपूरकडे मार्गस्थ आहे. माऊलींच्या पालखीचा सातारा जिल्ह्यातील बरड येथे मुक्काम होता. उद्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री यांच्या समवेत राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर उपस्थित होते.