पिंपरी:प्लास्टिक वापरणे व्यावसायिकाला पडले महागात दंडात्मक कारवाई
पिंपरी-चिंचवड महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळने पिंपरी कॅम्पात प्लास्टिक वापरणा-या व्यावसायिकांवर कारवाई केली. चार दुकानदारांकडून 5 हजार रुपयांप्रमाणे 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला.
महाराष्ट्र सरकारने 23 मार्च 2018 पासून राज्यात प्लास्टिक बंदी केली आहे. प्लास्टिक अविघटनशील असल्यामुळे राज्य सरकारने प्लास्टीकचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी आणि साठवणुकीवर 23 मार्च 2018 रोजीच्या अधिसूचनेद्वारे बंदी घातली आहे. प्लास्टिकचा वापर करणा-यांवर पिंपरी महापालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे.
एमपीसीबीचे अधिकारी आणि महापालिका ग्रीन मार्शलच्या पथकाने पिंपरी मार्केटमधील दुकानांची तपासणी केली. 17 दुकाने तपासली. त्यातील 4 दुकानात प्लास्टिक मिळाले. चार दुकानदारांकडून 5 हजार रुपयांप्रमाणे 20 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.