अभ्यासक्रमात सावरकरांची जीवनगाथा
कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने अभ्यासक्रमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा धडा वगळण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील माध्यमिक शिक्षण मंडळाने विनायक दामोदर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि बिरसा मुंडा यांच्यासह 12 महापुरुषांची जीवनगाथा नववीच्या अभ्यासक्रमात सामील करण्याची घोषणा केली आहे. युपीच्या शिक्षण मंडळाचे सचिव दिव्यकांत शुक्ल यांनी ही माहिती दिली.