देश:विजेचे बिल सुमारे 20 टक्क्यांनी घटणार
केंद्र सरकार वीज बिल कमी करण्यासाठी नवा फॉर्म्युला आणत आहे. त्यामुळे वीज बिल सुमारे 20 टक्क्यांनी घटू शकते. ऊर्जा मंत्रालय नवीकरणीय ऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी हे नियम आणत आहे. त्यानुसार, दिवसा वीज 20 टक्के स्वस्त, तर पिक अवरमध्ये 20 टक्के महाग राहील. व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांसाठी एप्रिल 2024 पासून हे नियम लागू होतील. सकाळी 6 ते 9 व सायंकाळी 6 ते 9 हे तास पिक अवर्स गृहीत धरले जाणार आहेत.