पहिल्या विवाहाची माहिती लपवून ठेवत दुसरे लग्न…दुसऱ्या पत्नीचाही छळ
पहिली पत्नी हयात असतानाही एका व्यक्तीने दुसरे लग्न केले. लग्नानंतर त्याने दुसऱ्या पत्नीचाही छळ केला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना 23 जानेवारी 2020 ते 20 जून 2023 या कालावधीत चऱ्होली खुर्द येथे घडली.
जावेदमिया मेहमूदमिया जहागीरदार (वय 45, रा. तळवडे. मूळ रा. धुळे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याची पहिली पत्नी हयात असताना त्यांच्या विवाहाची माहिती फिर्यादी पासून लपवून ठेवली. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्याचे नाव नाना पाटील असे सांगितले.
फिर्यादी सोबत लग्न केले.त्यानंतर घरगुती, आर्थिक व इतर कारणांवरून त्यांना शारीरिक व मानसिक त्रास दिला. फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.