पिंपरी चिंचवड:सावधान!! दररोज शेकडो लोकांची होते ऑनलाईन टास्क फसवणुक
सायबर फसवणुक करणाऱ्यांची संख्या दररोज वाढत आहे. फसवणुकीची ही पद्धत कितीही स्पष्ट दिसत असली तरीही दररोज शेकडो लोक याला बळी पडत आहेत.
तुम्हाला दिलेले YouTube चॅनल किंवा पेज लाइक आणि सबस्क्राईब करा आणि नंतर आम्हाला स्क्रीनशॉट द्या आणि तेथे पैसे मिळवा. अशा प्रकारचे लक्षवेधी संदेश मोबाईलवर येत असल्यास त्यांना कोणत्याही प्रकारचे उत्तर न देता सरळ तो नंबर आणि संदेश ब्लॉक करावा.अशा आमिषाला बळी पडून फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच एका नागरिकाने सतर्क होऊन #OnlineTaskScam बद्दलचे काही महत्वाचे स्क्रीनशॉट पिंपरी चिंचवड Twiitter माध्यमातून पाठवले आहेत.सुरवातीला ऑनलाईन टास्कच्या कामाचे महत्व पटवून देऊन लगेच त्वरित कमाईच्या संधीचे आमिष दाखविले जाते
तसेच देऊ केलेले काम किती सोपे आहे हे पटवून देणारे संदेश सुरवातीला पाठविले जातात.तुमच्या वैयक्तिक किंवा सध्याच्या नोकरीवर याचा १००% परिणाम होणार नाही व प्रत्येक कामासाठी आम्ही 50-70 रुपये आणि | दररोज आम्ही 3500-15000 रुपये देतो. येथे पेमेंटचे वर्णन करणारे मेसेज पाठवून नागरिकांची फसवणूक होते आहे. टास्क पूर्ण
केल्यास तुम्ही २५०० रुपये कमवाल अशा पैशाच्या मोहपाशात अडकवले जाते.विशिष्ट काम देऊन ते काम अतितातडीचे असल्याचे भासवून त्याच्या पूर्ततेसाठी सततचा चिकाटीने पाठपुरावा केला जातो.संदेश पाठविणाऱ्या ग्राहकाची विश्वासार्हता संपादन करण्यासाठी तात्काळ काम व मोबदला देऊ असे खात्री देणारे मेसेज पाठविले जातात.नागरिकांनी जागरूक रहावे व याबाबतची आधिक माहिती उपलब्ध होण्यासाठी #cyberawareness हा हॅशटॅग या ट्विटर हॅण्डल वर देण्यात आला आहे.