February 26, 2024
PC News24
हवामान

मुंबई:पावसाने मुंबईमध्ये विविध ठिकाणी ऐलर्ट!! 

मुंबई:पावसाने मुंबईमध्ये विविध ठिकाणी ऐलर्ट!! 

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करायला लावणाऱ्या पावसाने अखेर मुंबईत हजेरी लावली आहे. शुक्रवारी रात्रीपासून मुंबई शहर, उपनगरात पावसाच्या हलक्या सरी कोसळताना दिसत होत्या. त्यानंतर शनिवारी पहाटेही पावसाने सकाळीच हजेरी लावत मुंबईकरांना उकाड्यातून दिलासा दिला. सध्या पावसाचा जोर कमी असल्याने मुंबईतील रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत सुरु आहे.

दरम्यान, प्रादेशिक हवामान विभागाने मुंबईला २६-२७ जून रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या आणखी काही भागांमध्येही मान्सूनची प्रगती होईल, असा अंदाज आहे. २३ जून रोजी विदर्भाच्या काही भागांमध्ये मान्सून दाखल झाल्याचेही भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले.

पालघर जिल्ह्यासाठीही मंगळवारी यलो अ‍ॅलर्ट आहे. रायगड, रत्नागिरीमध्ये आज, शनिवारपासून मंगळवार पर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर सिंधुदुर्गातही सोमवार पर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

मुंबईत शुक्रवारी कुलाबा येथे ३४.६ तर सांताक्रूझ येथे ३४.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. सकाळी रिमझिम पाऊस पडला; मात्र त्याची नोंद शून्य मिलीमीटर झाली. मुंबई आणि ठाण्यात अनेक ठिकाणी पाच मिलिमीटर पर्यंत पावसाची नोंद झाली.

Related posts

लोणावळ्यात पावसाची जोरदार हजेरी-२४ तासांत २१२ मिलिमीटर पावसाची नोंद.

pcnews24

पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस,जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट.

pcnews24

पुण्यात मान्सून दाखल हलक्या पावसाने सुरुवात

pcnews24

मावळ:पवना धरण 77.80 टक्क्यांवर; गेल्या 24 तासात 115 मिमी पाऊस.

pcnews24

आळंदी येथील भक्ती सोपान पूल पाण्याची पातळी वाढल्याने रहदारीस बंद.

pcnews24

मुसळधार! लोणावळा शहरात 24 तासात 273 मिमी विक्रमी पावसाची नोंद.

pcnews24

Leave a Comment